Home मनोरंजन अभिनेत्री अमृता राव ला पुत्ररत्न

अभिनेत्री अमृता राव ला पुत्ररत्न

17
0

मुंबई : अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अमोलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्यांचा वर्षाव होत आहे.
तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यां दोघांनी यासंदर्भातील माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. त्याचसोबतच त्यांनी अमृता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. चाहत्यांकडून अमृता राववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचसोबत सगळे अमृताच्या बाळाचं नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याचा पहिला फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अमृता आणि आरजे अनमोल यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे सर्वच अत्यंत आनंदी आहेत. तसेच अमृता आणि आरजे अनमोल दोघांनीही चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत.’ अमृता राव आणि आरजे अनमोल यांचे २०१६ मध्ये लग्न झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here