Home क्रीडा दिल्लीकॅपिटल्स संघाची मोठी घोषणा !

दिल्लीकॅपिटल्स संघाची मोठी घोषणा !

308
0

दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कॅप्टनची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवण्यात आली .आणि त्याचसोबत अक्षर पटेलला उपकार्णधारपद देण्यात आले . कार अपघातात झाल्यामुळे दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत हा 2023 च्या आयपीएल मधून बाहेर पडला आहे. पंत पुढील आयपीएल मध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

वॉर्नरने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार होता . त्याने 2016 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. मेगा लिलावात दिल्ली ने 6.25 कोटी रुपयांनी विकत घेतले .दुसरीकडे अक्षर पटेलबद्दल सांगायचे तर 2019 मध्ये दिल्लीने त्याचा संघात समावेश केला होता.तो फ्रँचायझीचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने चेंडू आणि बॅटने प्रभावी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या आगामी मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला सामना हा लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध असणार आहे.
सध्या दुखापतमुळे ऋषभ पंतच्या जागी दिल्ली संघात कोणत्याही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. पंत हा दिल्ली संघाचा भाग आहे, मात्र दुखापतीमुळे तो या 2023च्या आयपीएल मध्ये खेळू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here