Home महाराष्ट्र बच्चू कडू;राहुल गांधीवरील कारवाई चुकीची

बच्चू कडू;राहुल गांधीवरील कारवाई चुकीची

284
0

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयावरुन बच्चू कडू यांनी सरकारला टोला लगावला आहे. तसंच आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, असंही ते म्हणाले आहेत.
राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राहुल गांधी यांच्याप्रमाणेत राज्यात बच्चू कडू यांचीही आमदारकी रद्द व्हायला हवी, अशा आशयाचे पोस्टर्स राज्यात लागले आहेत. त्यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “बॅनर लावलेले कार्यकर्ते अतिउत्साही आहेत. मी केलेलं आंदोलन स्वतःसाठी नाही. मी अपंग बांधवांसाठी केलं. मला दोन गुन्ह्यांमध्ये एक-एक वर्षांची शिक्षा आहे. माहिती घेत नसल्यामुळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मागे आहेत.”
माझ्यावर कारवाई झाली, आमदारकी रद्द झाली तर मला आनंदच होईल, असंही बच्चू कडू म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here