Home रत्नागिरी शिंदे गटाचा आणखी एक शिलेदार ठाकरे गटात ; रामदास कदमांना रत्नागिरीत मोठा...

शिंदे गटाचा आणखी एक शिलेदार ठाकरे गटात ; रामदास कदमांना रत्नागिरीत मोठा धक्का

230
0

रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र रत्नागिरीमध्ये काहीस वेगळं चित्र पहायला मिळत आहे. रामदास कदम यांचे भाऊ जिल्हा परिषद सदस्य असलेल्या फुरुस जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती सदस्य गणेश मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचा खुलासा रामदास कदम यांनी केला आहे.

गेल्याच आठवड्यात शिंदे गटाचे तालुका प्रमुख विजय जाधव यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला होता , आता त्या पाठोपाठ थेट रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यातील पंचायत समिती सदस्य असलेले गणेश मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे दापोली विधानसभा मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले आहे. हा कदम यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तर दुसरीकडे दापोली विधानसभा मतदार संघातील माजी आमदार संजय कदम हे देखील 5 मार्चला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विराट सभा घेऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्या पार्शवभूमीवर शिंदे गटातील अनेक दिग्गज पदाधिकारी आता ठाकरे गटात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here