Home छत्रपती संभाजी नगर समृद्धी महामार्गावर आणखीन एक अपघात ; ६ जण ठार तर ६ जण...

समृद्धी महामार्गावर आणखीन एक अपघात ; ६ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी

202
0

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघात ६ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे.मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर येथील दोन कुटुंब शेगाव इथं गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चालले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी पिसा गावात दरम्यान मारुती अर्टिगा वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.

आज सकाळी हा अपघात झाला असून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. (धावत्या रिक्षावर चौथ्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड, मायलेकीचा मृत्यू) छत्रपती संभाजीनगर येथून बोरुडे आणि बर्वे परिवार शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता जात होते, मात्र समृद्धी महामार्गावर शिवणी पीसा गावाजवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे वरचे छप्पर उडून यामधील प्रवासी अक्षरशः रस्त्यावर विखुरले गेले होते. या अपघाताची नंतरची ही दृश्य मनाला चटका लावून जाणारी आहेत.
या अपघातात तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये २ लहान चिमुकल्यांचाही समावेश आहे. तर सहा जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर एकापाठोपाठ भीषण अपघात झाले आहे. त्यामुळे महामार्गावरअपघातांची जणू काही मालिकाच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here