Home बीड बिबट्यासह कोरोनानेही केला बीड जिल्ह्याला बाय-बाय

बिबट्यासह कोरोनानेही केला बीड जिल्ह्याला बाय-बाय

आज २८ बाधित तर ४८ रुग्ण कोरोना मुक्त बाधितांमध्ये एका शिक्षकांचा समावेश

763
0

बीड : संपूर्ण जगात गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५,८६४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यातील ५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १०,३६७ शिक्षकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून यातील १०६ शिक्षक कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत तर २६५ शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे. गेल्या एक महिन्यापासून बीड जिल्ह्यात कोरोना पेक्षाही घातक असलेल्या बिबट्याने थैमान घालून तब्बल आठ जणांचा जीव घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून नरभक्षक बिबट्या बीड जिल्ह्यात नसल्याचे जाणवत असून बिबट्या प्रमाणेच कोरोनाव्हायरस देखील बीड जिल्ह्याला घाबरला असून पळून गेल्याचे दिसून येत आहे.


आज दुपारी प्राप्त झालेल्या ८२१ संशयित रुग्णांच्या अहवालांमध्ये ७१३ कोरोना निगेटिव्ह तर २८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये बीड ८, अंबाजोगाई७ ,धारूर १, गेवराई १, केज ४, माजलगाव ४, परळी २ तर वडवणी तालुक्यातील १ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आज ४८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १४,९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३,७१,९५९ संशयित रुग्ण आढळून आले असून यातील १,६४,२४७ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये १,४८,३८३ रुग्ण कोरोना निगेटिव्ह निघाले असून १५,८६४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९३.९३ % असून पॉझिटिव्हिटी रेट ११.४% तर डेथ रेट ३.१२ % आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४९६ तर इतर जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद असलेले ४ असा एकूण ५०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. जिल्ह्याचा डब्लिंग रेट ११९.३ असून कॉन्टॅक्ट ड्रेसिंगचा प्रति रुग्ण रेशो २३.४४ आहे. बीड जिल्ह्यातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.९३ टक्के आहे. सद्यस्थितीत ४५५ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग कोरोना व्हायरस सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याने कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या नियमांचे पालन केले तर आपण कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो. त्यासाठी नागरिकांनी निष्काळजीपणा टाळून कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.

आज एक शिक्षक कोरोना बाधित
जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांचे कोरोना अहवाल तपासण्याचे आदेश दिल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यातील १०,३६७ शिक्षकांनी आजपर्यंत स्वाब दिले असून यातील १०६ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले असून २६५ शिक्षकांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार अंबाजोगाई १६, आष्टी १६, बीड १८, धारूर ३, गेवराई १४, केज १३, माजलगाव २, परळी १४, पाटोदा ४, शिरूर ५ तर वडवणी तालुक्यात १ असे १०६ शिक्षक कोरोना बाधित निष्पन्न झाले आहेत. आज अंबाजोगाई तालुक्यातील एक आणि धारूर तालुक्यातील एक अशा दोन शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here