
रांची : टीम इंडियाचा “कॅप्टन कूल “माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीनंतर शेती करण्याचे ठरविले. सध्या तो रांचीमध्ये ऑरगॅनिक शेती करत आहे. ५५ एकरच्या जमिनीवर तो विविध भाज्या तसेच फळांची शेती करत आहे. त्याच्या शेतातील भाज्या रांची मधील मार्केटमध्ये विकण्यास आल्या होत्या . आता माहीच्या शेतातील भाज्या म्हणजे ग्राहकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. आता त्याच्या शेतातील भाज्या थेट दुबईत पोहचणार आहेत. धोनीचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात दिसून येतात. त्यात धोनीने केलेल्या प्रत्येक गोष्टीचे चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यातूनच तो निसर्गाच्या अधिक समीप असल्याचे जाणवते. सोबतच शेतीशी त्याचे घट्ट नटे दिसून येते.आता त्याच्या फार्म हाऊसमधील भाज्या दुबईत नेण्यासाठीची अंतिम तयारी सुरु आहे. त्यामुळे लवकरच दुबईतही त्याच्या शेतातील भाज्या पोहचणार आहेत.
बाजार समितीचे पणन सचिव अभिषेक आनंद यांनी सांगितलं की ‘एमएस धोनी मोठा ब्रांड आहे आणि त्याच्यासोबतच झारखंडचं नावही जोडलं गेलं आहे. याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनाही होईल. सुरुवातीला इकडे फार कोणी यायचं नाही, पण धोनीचं नाव जोडलं गेल्यामुळे आता इथल्या भाज्या परदेशातही विकल्या जातील.
काय काय पिकते धोनीच्या शेतात :
धोनीचं फार्म हाऊस 55 एकर भागात पसरलं आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी, कोबी, टोमॅटो, ब्रोकोली, मटार यांची शेती केली जाते.

कमी किमतीत विकल्या जातात भाज्या :
धोनी बाहेरपेक्षा कमी किंमतीला भाज्या विकत आहे. रांचीच्या फळमंडीच्या बाजूलाच याची विक्री केली जाते. धोनीच्या शेतातला कोबी 10 रुपये किलो, टोमॅटो 30 रुपये किलो विकला जात आहे. होलसेलमध्ये तर या भाज्या आणखी कमी किंमतीला विकल्या जातात.
दुधाचाही पुरवठा होतो :
रांचीमध्ये धोनीच्या डेयरीमधलं दूधही विकलं जात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लालपूरमध्ये धोनीच्या डेयरीमध्ये दूध घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रोज सकाळी आणि संध्याकाळी धोनीच्या फार्म हाऊसमधून लालपूरमधल्या आऊटलेटमध्ये फ्रिजन आणि साहिवाल गायीचं दूध पोहोचवलं जातं. या दुकानात रोज जवळपास 270 लीटर दूध पोहोचवलं जातं. फ्रिजन गायीचं दूध 55 रुपये आणि साहिवाल गायीचं दूध 80 रुपये प्रती लीटर विकलं जातं.