Home मुंबई ‘याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील’ : तेजस यादव

‘याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील’ : तेजस यादव

96
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील,पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील,’ अशा शब्दांत शिवसेनेनं तेजस्वी यादव यांच्या लढ्याचं कौतुक केलं आहे.बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीने बहुमत मिळवले आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी एनडीएला कडवी लढत दिली. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेल नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. या सगळ्या निकालाचं कवित्व आता सुरू झालं आहे. शिवसेनेनं ‘सामना’ च्या अग्रलेखातून बिहारच्या निकालावर भाष्य केलं आहे. शिवसेनेनं तेजस्वी यादव यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

तेजस्वी यांनी एक महागठबंधन बनवले. त्यात काँग्रेससह डावे पक्ष आले, पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही,’ असं निरीक्षणही शिवसेनेनं नोंदवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here