Home बारामती अजित पवारांचा बारामतीतल्या टुकार पोरांना इशारा म्हणाले ,कायदा-सुव्यवस्थेला ठेच लावाल, तर...

अजित पवारांचा बारामतीतल्या टुकार पोरांना इशारा म्हणाले ,कायदा-सुव्यवस्थेला ठेच लावाल, तर याद राखा

592
0

बारामती:बारामतीमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेला ठेच लावाल तर याद राखा. गाठ माझ्याशी आहे. प्रत्येक आई-बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावे, असा इशाराही त्यांनी दिला.टवाळ पोरांनी फॅमिली, मुलींना त्रास दिला. कुणाला काय केले, तर सोडणार नाही. बारामतीमध्ये कुणालाही असुरक्षित वाटता कामा नये. गार्डनमध्ये मुले-मुली बसल्या. कोणी वेडे-वाकडे वागले, तर त्यांचीही गय करणार नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला. बारामतीतल्या वाढत्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा इशारा दिला. सत्ता नसली, तरी आपली कामे अडत नाहीत. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र, कामात राजकारण आणत नसल्याचे त्यांनी सांगितले.अजित पवार म्हणाले, आजचा दिवस मी कुटुंबासाठी दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. उद्या माझा भाऊ ६१ व्या वर्षात पर्दापण करत आहे. माझे केस काळे आहेत, पण त्यांचे केस पांढरे आहेत, असे खुसखुशीत भाष्य त्यांनी केले. शिवाय आपण दुधाच्या व्यवसायातून कसे पुढे आलो, वडिलांच्या निधनानंतर कशा खस्ता खाल्ल्या, याचे किस्से त्यांनी सांगितले.अजित पवार म्हणाले, व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा एक गाय साडेसात हजारांना मिळायची. जमीन साडेसात हजारांना एकर होती. दर कमी होते. बारामतीच्या पंचक्रोशीतले लोक गायींसाठी पंखे लावायचे. शेतीत कष्ट घेतले की, यश मिळतेच. आता गायींचे योग्य पोषण होते. गायी, म्हशी सुदृढ आहेत. त्यामुळे शेणही भरपूर मिळते. त्यांच्या आहारवर शेतकऱ्यांनी अभ्यास केलाय. दर १२ तासांनी गायी, म्हशीचे दूध काढल्यामुळे त्यांचे आरोग्यही नीट राहते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here