Home मनोरंजन अभिनेत्री तेजस्विनी पंडितची फोटोसिरीजद्वारे कोविड यौद्ध्यांना सलामी

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची फोटोसिरीजद्वारे कोविड यौद्ध्यांना सलामी

91
0

मराठवाडा साथी:.शिवानी आर. खिल्लारे
नवरात्रीनिमित्त विविध रूपातील फोटो पोस्ट करून केले अभिवादन
अनेक कलाकार सामाजिक जबाबदारी म्हणून काही ना काही भूमिका पार पाडत असतात. त्यात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीनिमित्त विविध कोविड यौद्ध्यांचे देवीच्या रूपातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कर्तव्यापार असणाऱ्या महिलांना अभिवादन केले आहे. मागील वर्षीही तिने अशीच रूपे घेऊन अनेक प्रश्नावर प्रकाश टाकला होता. त्यात अमेझॉनला लागलेली आग याची वस्तुस्थिती तिने पृथ्वी देवीचे रूप घेऊन मांडली होती. तर कामाख्या देवी, गावदेवी अशी रूपे घेऊन तिने आरेची कत्तल, महिलांवरील अत्याचार या प्रश्नावर प्रकाश टाकला होता.
यावर्षीही अभिनेत्री तेजस्विनी पंडितने विविध रूपातील फोटो पोस्ट करून समाजाप्रती आपली जागृत भावना व्यक्त केली आहे. डॉक्टर रूपातील दुर्गा, पोलिसी खाकीतील कर्तव्य पार पडणारी निर्भीड दुर्गा, साफसफाई करणारी कर्तव्यावर दक्ष असणारी नवदुर्गा, तर शेत-शिवारात राबणारी शेतकरीण तर कधी सामाजिक कार्यकर्ती बनून भुकेल्यांची भूक भागवणारी दुर्गा, रुग्णालयातील महत्त्वाचे साधन असणारी रुग्णवाहिका चालवून नवजीवन देणारी दुर्गा, सीमेवर हातात बंदूक घेऊन देशाचे रक्षण करणारी काली अशी विविध रूपे घेतलेली फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. प्रथम, द्वितीय असे नाव देत आणि त्यांचे कार्य अधोरेखित होईल अशा कविताही तिने पोस्ट केल्या आहेत.
प्रतिपदा या नावाने तिने
“दैत्याने जिंकण्या मला देह तुझाच वेठीस धरला
अन् मग मी सौन त्रिशूळ भाला
हाती stethoscope धरला…
घुस्मटला जीव जरी हिम्मत तुझी सोडू नकोस
आईच उभी आहे PPE किट मागे
विसर त्याचा पडू नकोस ,
विसर त्याचा पडू नकोस…”
हे कवितेतून डॉक्टरांचे कार्य अधोरेखित केले आहे. याचे लेखक आर. जे. आधीश आहेत. हे सर्व फोटो पोस्ट करत तिने विविध भूमिकेत पार पडणाऱ्या महिला यांच्या रूपातील देवीला तिने नमन केले आहे. एकप्रकारे खऱ्या नवदुर्गा यांच्यात पाहण्याचा संदेशच तिने समाजमाध्यमांवर दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here