Home मनोरंजन अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन

अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन

236
0

मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचं निधन झालं आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या निधनाने महिमावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमासह तिची मुलगी अरियानाचीही रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. महिमाने अद्याप आईच्या निधनाबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

नुकतंच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आईचं निधन झालं. अभिनय जगतातील अनेक कलाकार त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. तसेच माधुरी दीक्षितच्या आईचेही दोन-तीन आठवड्यांपूर्वी निधन झाले होते. अशातच आता महिमा चौधरीच्या आईचंही निधन झालं आहे.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, महिमाची आई मागच्या काही काळापासून आजारी होत्या व त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. महिमा मागच्या काही काळापासून वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरी जात आहे. तिला कॅन्सरचं निदान झालं होतं. २०२२ मध्ये तिने या गंभीर आजारावर मात केल्याचा खुलासा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here