Home मनोरंजन अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न…?

अंकिता लोखंडे लवकरच करणार लग्न…?

408
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये अंकिता लोखंडेने आपल्या हातांवर मेहंदी काढली असून ती खूप आनंदात दिसत आहे.या फोटोजमध्ये अंकिताने ब्रायडल लूक कॅरी केला आहे.फोटोंमध्ये अंकिताचा बॉयफ्रेंड विक्की जैनही दिसत आहे. त्याच्या मेहंदीची डिझाइनही सेम आहे.दोघही ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत.फक्त एव्हढेच नाही तर काही फोटोंमध्ये काही नातेवाईक त्यांना शुभेच्छा देतानाही दिसत आहेत.त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर अंदाज लावण्यात येत आहे की,अंकिताची लगीनघाई सुरु असून तिने गपचूप आला मेहंदी समारंभ उरकून घेतला आहे. तसेच लवकरच ती आपला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.अंकिता आणि तिची बहिण अशिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. अंकिताने आपले हे फोटो इन्स्टाग्रामवर QandA सेशनदरम्यान शेअर केले होते.

दरम्यान,अंकिता बऱ्याच दिवसांपासून विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्यापूर्वी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here