Home बीड शासन स्तरावर आमदार पवारांच्या उपोषणाची घेतली तातडीने दखल

शासन स्तरावर आमदार पवारांच्या उपोषणाची घेतली तातडीने दखल

484
0

गेवराई
अवैध वाळू उत्खनन करून वाळू माफियांनी निष्पाप नागरीकांचा जीव घेतला असून, शासन आणि प्रशासनाकडून जो पर्यंत ठोस निर्णय घेऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आमदार लक्ष्मण पवार यांनी जाहीर केल्यानंतर, शासन स्तरावरून दिवसभरात आमदार पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र, मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन, खराब झालेल्या रस्त्याचे ऑडिट केल्याशिवाय व मयत कुटुंबाला नुकसान भरपाई दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, या निर्णयावर ते ठाम राहीले. त्यामुळे, शासनाकडून आमदार पवार यांच्या मुख्य मागण्या मान्य करून, 27 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मा. सचिव,महसूल व वन विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली असून, वाळू मुळे खराब झालेले रस्ते पून्हा करण्यात येतील , असे स्पष्टपणे लेखी सांगण्यात आल्याने, आमदार लक्ष्मण पवार यांनी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री आठ वाजता उपोषण मागे घेतले.

तालुक्यातील गोदापात्र व सिंदफना नदी पट्ट्यात रात्री-अपरात्री हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित वाळू तस्कर महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गोदापात्रात वाळूचे उत्खलन करत असल्याचे वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना अनेकवेळा सूचना निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, वाळू लिलावबाबत विविध मागण्या घेऊन आमदार लक्ष्मण पवार यांनी मंगळवार ता. 19 रोजी सकाळी अकरा वाजता, गोदापट्ट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. 

गेवराई तालुक्यात गोदापत्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीबाबत आ.लक्षण पवार यांनी दि.13 जानेवारी रोजी प्रशासनाला निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता या बाबत प्रशासनाने कुठलीही दखल ना घेतल्याने त्यांनी आज सकाळपासून उपोषणाला सुरुवात केली. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की दि.4 जानेवारी रोजी राक्षसभुवन रोडवरील गंगावाडी येथील रुस्तुम मत्ते यांना वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने गोदा पट्ट्यातील ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणात गाडी जप्त करून संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल केला असून विशेष म्हणजे सदरील वाहनाचा मालक पोलीस कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या आधीही वाळूने भरलेल्या वाहनांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत तरी प्रशासन कोणतीही कठोर पावले उचलल्याचे निदर्शनात आले नाही. त्यामुळे गोदा पट्ट्यातील होणारा अवैध वाळू उपसा कायमचा बंद करण्यात यावा,वाळू तस्करी करणाऱ्या वर कठोर निर्बंध घालावेत, वाळू लिलावाचे टेंडर तातडीने करून किचकट टेंडर प्रक्रिया सुलभ करून त्याचे दर कमी करण्यात यावेत,असे केल्याने अवैध वाळू तस्करी व चोरीवर नियंत्रण ठेऊन वाहने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने धावणार नाहीत इतक्या वर्षात गोदाकाठच्या वाळूचे लिलाव झालेले नाही त्यामुळे सहा वर्षात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. वाळू लिलावाचे अपसेट प्राईस जास्तीचे असल्यामुळे लिलाव टेंडर घेण्यास संबंधित गुत्तेदार धजावत नाहीत त्यामुळे ही अपसेट प्राइस कमी करावी, जिल्हाधिकारी स्तरावर महसूल व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा व त्यामध्ये माजी सैनिकांना सामावून घ्यावे, टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करून वाळू तस्करी व साठा करणाऱ्या वर धाडी टाकाव्यात, वाळू तस्करांना रात्री-अपरात्री मोबाईल द्वारे अपडेट माहिती देणाऱ्या महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल संभाषण तपासून दोषींवर कारवाई करावी, गंगावाडी प्रकरणात तलाठी निलंबित करण्यात आला आहे मात्र पोलीस अमलदार यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. गेवराई मतदार संघात असलेल्या गोदावरी सिंदफना नदी पट्ट्यातील वाळू वाहतूक व उत्कलन बाबत असलेले नियम अपसेट प्राईस संदर्भात तातडीने मंत्रालयात सचिव स्तरावर बैठक घेण्यात यावी यासह आदी मागण्या घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी गोदावरी व सिंदफना पट्यातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू केले होते. यातील प्रमुख मागण्या शासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत. 27 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मा. सचिव,महसूल व वन विभागाच्या कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली असून, वाळू मुळे खराब झालेले रस्ते पून्हा करण्यात येतील , असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने, आमदार लक्ष्मण पवार यांनी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री आठ वाजता उपोषण मागे घेतले.
तहसील कार्यालया समोर उपोषणास बसलेल्या आमदार पवार यांना पाठींबा देण्यासाठी
जि.प.सदस्य पांडुरंग थडगे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर, भाजपा किसान आघाडीचे देविदास फलके,जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, दीपक सुरवसे, उपसभापती संदीप लगड, प्रा.शाम कुंड, अरुण चाळक, ऍड.उद्धव रासकर,दूषण डोंगरे, हिरापूरचे सरपंच अमोल तिपाले,नगरसेवक अरुण मस्के,राहुल खंडागळे, अजित कानगुडे, भरत गायकवाड, जनमोहमद बागवान, माऊली पवार, भगवान घुंबार्डे, कृष्णा काकडे, छगन हादगुले, संजय इंगळे, राम पवार,किशोर धोंडलकर, राजाभाऊ मातकर, समाधान मस्के,मनोज हजारे, बाबा वाघमारे,संतोष भोसले, किशोर कोकरे, सुंदर काकडे, राजाभाऊ भंडारी, मधुकर वादे, सतीश दाभाडे, शेख अब्दुल भाई, मंजूर बागवान, शोएब आतार, बाबाराजे खरात,लक्ष्मण चव्हाण, गणेश मुंडे, शिवनाथ परळकर, जिजा कौचट, सरपंच घाटूळ, रविराज आहेर, महेश ढेरे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. दरम्यान, आमदार पवार यांना पाठींबा देत राजू शेख, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, अनिल साळवे, उस्मान शेख, सय्यद सादेक, राणा कानडे, पप्पू कांबळे, रंजित खाजेकर,मोहन राखुंडे यांनी 21 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here