Home अर्थकारण खात्यात जमा PF वर मिळणार भरमसाठ व्याज

खात्यात जमा PF वर मिळणार भरमसाठ व्याज

405
0

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदाराला ८.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये २०२१-२२ साठी EPF वरील व्याज ८.१% या नीचांकी पातळीवर घसरला होता. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे ६ कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सरकारने पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर ८.५% वरून ८.१ टक्क्यांवर आणला, जो जवळपास ४० वर्षांतील सर्वात कमी व्याजदर राहिला. १९७७-७८ मध्ये ईपीएफओने ८% व्याजदर निश्चित केला होता, मात्र तेव्हापासून व्याजदर सतत ८.२५% किंवा त्याहून अधिक राहिला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के व्याज मिळत होते.

एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १२% कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात कम केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७% EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ अपेक्षित होती. कमाईच्या बाबतीत कर्मचारी संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगले होते. ईपीएफओचे उत्पन्न वाढले असून EPFO तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवते जिथून त्याला परतावा मिळतो. आणि याच गुंतवणुकीद्वारे संघटनेच्या सदस्यांना जमा पीएफवर व्याज मिळते. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणे दिली जात होती. यावेळी ८.२९% पर्यंत व्याजदर वाढण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here