Home क्राइम 2 वेळा पाठलाग करून मारहाण, 15 तोळं सोनं लुटलं

2 वेळा पाठलाग करून मारहाण, 15 तोळं सोनं लुटलं

239
0

मुंबई गोवा महामार्गावर रविवारी रात्री 2 च्या सुमारास 20 ते 25 जणांनी एका कुटुंबाला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील जवळपास 15 तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.रविवारी रात्री 2 च्या सुमारास प्रशांत मोहिते हे आणि त्यांचे कुटुंबीय त्यात,त्यांचे आई, बाबा, भाऊ, भाचा, पुतण्या, बहीण, भाऊजी हे सर्वजण दापोली रत्नागिरी येथून मुंबईकडे निघाले होते, त्यावेळी पेण मधील दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल साई सहारा येथे एक एर्टिगा गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत आली.यानंतर मोहिते यांनी त्यांची गाडी बाजूला घेत त्यांना जागा दिली मात्र, त्याच गाडीतील एकाने मोहिते यांच्या गाडीवर दोन दगड मारले, यानंतर ती गाडी पुढे निघून गेली.

गाडीवर हल्ला झाल्यानंतर मोहिते यांनी त्यांचा पाठलाग केला आणि आपली गाडी त्यांचा पुढे नेऊन उभी केली, यावर दोन्ही गटात वादावादी झाली, यात आरोपींनी मोहितेंना मारहाण केली आणि ते निघून गेले. आपल्याला मारहाण झाल्याच्या रागातून पुन्हा काही अंतरावर मोहिते यांनी आपली गाडी आरोपी गटाच्या पुढे नेऊन थांबविली आणि त्यांना जाब विचारला. तितक्यात आणखी एक गाडी तिथे आली आणि त्या गाडीतून 8 ते 10 जण उतरले आणि पुन्हा मोहितेंना मारहाण केली. यात त्यांच्या गळ्यातील जवळपास 15 तोळे सोने ज्यात चेन, मंगळसूत्र, पेंडटअसा एकूण 4 लाख 65 हजारांचा ऐवज लुटून सर्व आरोपी पळून गेले.

मोहिते यांनी पुन्हा एकदा त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीच सापडला नसल्याने, मोहितेंनी पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत तक्रार दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोहितेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गाडीचे नंबर आणि जवळपास असलेले सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात,सुरेंद्र बिष्णोई, पूनमचद बिष्णोई, कुणाल देवरे, प्रभाकर उलवेकर, श्रीचंद बिष्णोई, शामसुंदर भगीरथराम या आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपींवर 395, 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून आरोपींचा मागील रेकॉर्ड इतर बाबी तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. तर असा प्रकार मुंबई गोवा महामार्गावर याआधी कधीच झाला नसून हे प्रकरण आम्ही गंभीर घेतले असून लवकरच याबाबत सत्यता पडताळून खुलासा करू, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here