Home महाराष्ट्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

4
0

मुंबई । माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वत फडणवीस यांना ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
फडणवीस यांनी आपल्या ट्विटर म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.


नुकतेच फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यासह विविध अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान अनेक जण त्यांच्या संपर्कात आले. फडणवीस यांनी तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्याची सुरवात बारामतीतून केली होती. यावेळी बारामती विमानतळावर राहुल कुल, खासदार रणजितसिंह निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यात राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी बीडमध्ये जाऊन अचानक ताफा गोपीनाथ गडाकडे वळवला आणि मुंडेंचे दर्शन घेतले. त्यावेळी सोबत पंकजा आणि प्रतिमा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा हे यावेळी सोबत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here