Home औरंगाबाद फोडणी आणि हॉटेलच्या प्लेटमधून कांदा गायब

फोडणी आणि हॉटेलच्या प्लेटमधून कांदा गायब

69
0

हॉटेलात कांद्यासाठी मोजावे लागणार पैसे

राकेश रवळे/प्रतिक्षा पगारे । मराठवाडा साथी न्यूज
आैरंगाबाद । शहरात कांद्यांचे भाव ५० ते ६० रुपये प्रति किलो झाल्याने घरगुती फोडणीतून आणि हॉटेलच्या प्लेटमधून कांदा गायब झाला आहे. सर्वसामान्यांसाठीचे टॉनिकच या महागाईने हिरावून घेतले आहे. त्यामुळे कांदा प्रेमींना आता काही दिवस नवीन कांदा येईपर्यंत आणि पुन्हा एकदा कांद्याचा लिलाव सुरू होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

मेन्युकार्डमध्ये कांदा मागवावा लागणार
कांद्याचे भाव वाढल्याने जिथे रस्सासाठी भरघोस कांदा वापरला जात होता. तिथे मर्यादा आल्या. तर हॉटेलात ‘चॅरीटी’ म्हणून कांदा आणि लिंबु दिले जात होते. ती पद्धत आता बंद झाली आहे. कांद्याची जागा आता काकडी, टोमॅटोने घेतली आहे. तर कांदा आता ‘ऑर्डर’ करावा लागणार आहे. मेन्युकार्डमध्ये कांदा मागवावा लागणार आहे. त्याचे वेगळे पैसे चार्ज होणार आहेत.

कांदा थाळीचे रेट वाढले
रोजच्या जेवणात कांदा हा आवश्यक असल्यामुळे आता मार्केटमध्ये भाव हा वाढला आहे. हॉटेल मालकाला कांद्याचे भाव वाढल्यामुळे जेवताना स्पेशल कांदा थाळीचे पैसे लावावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलमध्ये जेवणासाठी २० रु थाळीचे पैसे मोजावे लागतील. पाऊसामुळे यावेळेस कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जुना कांदा पाऊसामुळे खराब झाला, त्यामुळे कांद्याची आवकही घटली आहे. अनेक शेतकरी मार्केटमध्ये कांदा आणत नाहीत. शेतकरी हा कांद्याचे अजुन दर कसे वाढतील या आशेवर आहे. जोपर्यंत कांद्याची आवक बाजारात वाढत नाही. तोपर्यंत कांद्याचे भाव हे स्थिर होणार नाही.

तीन प्रकारचे कांदे आहेत बाजारात
कांद्याचे तीन प्रकार बाजारात आहेत. सगळ्यात बारीक कांदा ज्याला हॉटेलात जास्त मागणी आहे. त्या कांद्यांचा ज्युस रस्यासाठी वापरतात. तो कांदा वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो बाजारात मिळतो. दुसरा कांदा म्हणजे जो घरगुती स्वयंपाकात वापरला जातो. त्या कांद्यासाठी बाजारात जास्त मागणी आहे. त्या कांद्यास पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दर आहे. तिसरा प्रकार म्हणजे सगळ्यात मोठया प्रकारचा कांदा. हा जास्त करून हॉटेल व नाष्टा सेंटरवर वापरला जातो. या कांद्याचा दर ऐंशी ते पंच्चाऐंशी रुपये मार्केटमध्ये भाव वाढला आहे. जोपर्यंत नवीन कांदा मार्केटमध्ये येत नाही, तोपर्यंत कांद्याचे भाव वाढत जाणार आहेत.त्यामुळे रोजच्या जेवणात कांदा हा जपून वापरावा लागणार आहे.अनेक जण कांदा कमी खरेदी करताना बाजारात दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here