Home बीड बर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे

बर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे

64
0

बर्दापुर घटनेतील आरोपींना अटक करा- पप्पु कागदे

मराठवाडा साथी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळताची अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील झालेली विटंबनेचा प्रकार हा निंदनीय आहे. सामाजीक सलोखा बिगडवण्याचे षडयंत्र रचणाऱ्या या प्रकरणातील समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर अंदोलन छेडण्याचा ईशारा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला. बर्दापूर (ता. आंबेजोगाई) येथील महामानव डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मंगळवारी (ऑक्टोबर) दि. 28 अज्ञात माथेफिरूने दगडाने नासधूस करत विटंबना केली आहे. दरम्यान, आठरा पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने  नांदत असताना गावातील महामानव डा बाबासाहे आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विटंबणेचा प्रकार सामाजीक तेड निर्माण करणारा आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यवहार बंद आहेत. या प्रकरणातील अज्ञात माथेफिरूस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी भिम सैंनिकांनी पहाटेपासून पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बुधवारी दि.28 आक्टोबर बर्दापुर येथील घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची जाणुन घेतली.  घटनेचे गांभीर्य राखून प्रशासनाने नि:पक्षपातीपणे चौकशी करून यातील अज्ञात आरोपीस  तात्काळ अटक करण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा ईशारा ही पप्पू कागदे यांनी आमदार संजय दौंड , पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

जातीय सलोखा राखण्याचे आवाहन

आमची भूमिका ही समतेची व समानतेची आहे,  जे कोणी या घटनेमागचे माथेफिरु असतील त्यांना माफ करण्यात येऊ नये,  तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा सुव्यवस्था कायम ठेऊन जातीय सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहनही पप्पू कागदे यांनी यावेळी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here