Home मनोरंजन रंगीबिरंगी कपडे का घालतात ‘आठवले’…!

रंगीबिरंगी कपडे का घालतात ‘आठवले’…!

1186
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : भारतात राजकारण्यांच्या कपडे आणि स्टाईलवरसुद्धा चर्चा नेहमीच होते . राजकारणी लोकांच्या अशा प्रकारच्या अलीकडच्या या चर्चांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्त आहे. हेअरस्टाईल, दाढी आणि कपड्यांची चर्चा नेहेमी होत असते. रामदास आठवलेंचा कुणी असा एक ठारावीक डिझायनर किंवा टेलर नाही, ते वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या कपड्यांची खरेदी करतात. त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते कपडे खरेदी करत असतात, असं त्यांच्या प्रसिद्धीचं काम पाहाणारे मयुर बोरकर यांनी सांगितलं आहे.आठवलेंचा फॅशन सेन्स हा लोकांशी कनेक्ट करण्याचं एक माध्यम असल्याचं निरिक्षण आहे .

आठवले हे ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, ज्या समाजातून येतात तो समाज आणि वर्ग अजूनही तितकासा पुढारलेला नाही. या समाजात लांब केस आणि रंगिबेरंगी कपड्यांची फॅशन प्रचलित आहे. त्यांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आठवले अशा प्रकारचे कपडे घालतात.” कपडे हे रंगीबेरंगी दिसत असले तरी ते ब्रॅंडेड असतात. सामान्य लोकांना कधीकधी त्यांच्या कपड्यांची रंगसंगती विचित्र वाटू शकते. पण मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही मी तुमच्यातलाच एक आहे हे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सातत्याने दाखवायचं असतं. म्हणून ते अशा प्रकारचे कपडे घालतात.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here