मराठवाडा साथी न्यूज
एडिलेड : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी टीम भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.टीम इंडिया उद्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे दोन खेळाडू कसोटी मध्ये प्रवेश करणार आहेत. पहिल्या सामन्यात झालेला मानहानीकारक पराभवानंतर हा सामना जिंकण्याचं आव्हान घेऊन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयनं एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.विराट कोहली च्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत विकेटकीपर असेल तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं हे कसोटी पदार्पण असणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन- अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.कसोटीमध्ये प्रवेश करणार आहे.