Home क्राइम धनंजय मुंडे प्रकरण….!

धनंजय मुंडे प्रकरण….!

343
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई :धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार नाही असं राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार पैसा किंवा संपत्तीच्या वादातून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेलं नाही. तर मुंडेंचा राजकीय वारसदार कोण या वादातून हे महाभारत घडल्याची माहिती समोर आली आहे. महाभारत असो, रामायण असो, नाहीतर राजेराजवाड्यांचा इतिहास. गादीच्या वारसावरून घमासान घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.धनंजय मुंडे यांच्या घरातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून कन्या पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता धनंजय मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून आतापासूनच संघर्ष पेटला आहे आणि त्याचीच धग धनंजय मुंडे यांना बसली आहे.मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या करूणा शर्मा यांच्या बहिणीने म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप केले आहेत. पैशांसाठी हे ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा दावा स्वतः मुंडे यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here