Home मनोरंजन माझ्या कुंकवावर कोणाचे नाव ?अभिनेत्रीकडून रेखा कडून खुलासा

माझ्या कुंकवावर कोणाचे नाव ?अभिनेत्रीकडून रेखा कडून खुलासा

392
0

मुबई : रेखा हे नाव बॉलिवूडमध्ये सगळ्यात टॉपवर येतं. ती अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या काळात लाखो तरुणांना वेड लावलं, होतं. एवढंच काय तर आज देखील तिचे फॅन्स फॉलोइंग कमी झालेली नाही.

आपल्या काळी रेखा या उत्कृष्ट अभिनेत्री, नृत्यांगना सारख्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जायची. रेखाने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवले पण इंडस्ट्रीत असा एकच सुपरहिरो आहे ज्याच्या नावाने रेखाच्या हृदयाचा ठोका नेहमी चुकतो. ते नाव आहे अमिताभ बच्चन. ‘या’ कारणांमुळे वाढतायत विवाहबाह्य संबंधाची क्रेझ अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमकहाणीबद्दल सर्वांनाच ठावूक आहे.

बॉलिवूडमधील सगळ्यात चर्चीत प्रेमकहाणींमध्ये त्यांचं नाव सर्वात पहिलंच असावं. कारण त्यांची प्रेम कहाणी तितकीच कॉन्ट्रोवर्शिअल होती. हो कारण या दोघांचं एकमेकांवर प्रेम असून देखील त्यांनी एकमेकांशी लग्न केलं नाही. अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रेखा सध्या एकटीच आहे.

पण मग असं असलं तर रेखा कोणत्याही कार्यक्रमाला येताना साजश्रृंगार करुन आणि सिंदूर भरुन का येते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बिग बींच्या नावाने रेखाने त्यांच्या मागणीत सिंदूर भरल्याचे बोलले जाते. आता या प्रकरणात किती तथ्य आहे हे रेखाच सांगू शकते.

ऋषी कपूर आणि नीता सिंग यांचा विवाह 1980 मध्ये झाला होता. तेव्हा रेखाच्या सिंदूरची खूपच चर्चा झाली. साधारणपणे लग्नात लोकांच्या नजरा वधू-वरावर यांच्यावर असतात, पण या फंक्शनमध्ये येताच सर्वांच्या नजरा रेखा कडे वळल्या कारण त्या दिवशी रेखा सिंदूर भरून आली होती. रेखासोबत संजयचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

ज्याचा उल्लेख रेखाच्या बायोग्राफी ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये करण्यात आला होता. हे पुस्तक यासिर उस्मान यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या लाँचनंतर रेखा संजय दत्तच्या नावाने सिंदूर लावत होती अशी बातमी व्हायरल झाली. ही बातमी समोर आल्यानंतर यासिर उस्मानने स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आणि म्हणाले होते, ही बातमी चुकीची आहे.

1990 मध्ये रेखाने बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले, मात्र तीन महिन्यांतच हे लग्न तुटले. दोघांचा घटस्फोट झाला आणि काही दिवसांनी मुकेशने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मुकेशने रेखाच्या ओढणीनेच गळफास लावून घेतला होता. तसे पाहाता रेखाच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक रहस्ये अजूनही दडलेली आहेत.

ज्याबद्दल फार कोणाला माहित नाही. पण एका मुलाखतीदरम्यान रेखाला जेव्हा सिंदूरबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा तिने स्वत: याबद्दल खुलासा केला. तिने सांगितले होते की ती तिच्या डोक्यामध्ये कोणाच्याही नावाचा सिंदूर लावत नाही, तर ती फॅशन म्हणून हे लावते. रेखा म्हणाली होती की सिंदूर तिला खूप चांगला शोभतो आणि तो तिच्या मेकअपला सूट होतो म्हणून ती ते लावणे पसंत करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here