Home छत्रपती संभाजी नगर तंत्रशिक्षण संस्थांतील रिक्त‎ पदे त्वरित भरण्यात यावीत‎:विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांची...

तंत्रशिक्षण संस्थांतील रिक्त‎ पदे त्वरित भरण्यात यावीत‎:विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

207
0

छत्रपती संभाजीनगर‎:मराठवाडा विभागातील शासकीय‎ अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व‎ औषधनिर्माण संस्थांमधील रिक्त‎ असलेल्या वर्ग १ ते वर्ग ४ च्या रिक्त‎ पदांसंदर्भात आमदार सतीश चव्हाण‎ यांनी सोमवारी विधान परिषदेत‎ तारांकित प्रश्न उपस्थित करून‎ सभागृहाचे लक्ष वेधले.‎ आमदार चव्हाण म्हणाले की,‎ ‘मराठवाडा विभागात‎ तंत्रशिक्षणाच्या दर्जा व गुणवत्तेबाबत‎ नावाजलेले एक शासकीय‎ अभियांत्रिकी महाविद्यालय, एक‎ शासकीय औषधनिर्माणशास्त्र‎ महाविद्यालय, १० शासकीय‎ तंत्रनिकेतन अशा तंत्रशिक्षणाच्या‎ शिक्षण देणाऱ्या १२ संस्था आहेत.‎मात्र, या संस्थांतील अनेक पदे रिक्त‎ आहेत. ’‎ आमदार चव्हाण यांच्या प्रश्नाला‎ लेखी उत्तर देताना उच्च व‎ तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील‎ यांनी सांगितले की, ‘मराठवाडा‎ विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ ची‎ एकूण १,६९३ पदे मंजूर असून‎ त्यापैकी १,१६२ पदे भरलेली आहेत,‎ तर ५३१ पदे रिक्त आहेत. राज्यातील‎ अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र‎ पदवी व पदविका संस्थांतील‎ शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरती‎ प्रक्रियेसाठी संवर्गनिहाय आरक्षण‎ निश्चिती व बिंदुनामावलीची‎ तपासणी सहायक आयुक्त (मागास‎ वर्ग कक्ष) व सामान्य प्रशासन‎ विभागाकडून करून घेण्याची‎ कार्यवाही सुरू आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here