Home अर्थकारण भारतीय बँकांत ३५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे बेवारस पडून

भारतीय बँकांत ३५ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे बेवारस पडून

490
0

नवी दिल्ली : भारतातील बँकांमध्ये अनेक वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. या रकमेवर दावा न करण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. ठेवीदाराचा अचानक मृत्यू, नामनिर्देशित व्यक्तीचे नाव न मिळणे किंवा त्याच्या मृत्यूनंतर ठेवीदाराच्या कुटुंबीयांना त्याची माहिती नसणे, यामुळे बँकांमध्ये पडून असलेल्या या ठेवींचा आकडा कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. मात्र,आता अशा ठेवी सहज शोधता येतील.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी विविध बँकांमध्ये ठेवीदारांनी किंवा त्यांच्या लाभार्थींनी दावा न केलेल्या ठेवींचा तपशील मिळविण्यासाठी केंद्रीकृत पोर्टल स्थापन करण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठी पहिले द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करताना वेब पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली.

शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, या वेब पोर्टलद्वारे अनेक बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेता येईल. हे नवीन वेब पोर्टल बँक ग्राहकांना त्यांच्या ठेवी एकाच ठिकाणी शोधण्यात मदत करेल. सध्या १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी त्यांच्या लाभार्थ्यांना अनेक बँकांच्या वेबसाइटवर जावे लागते.

बँकेत जमा केलेलेल्या रकमेवर १० वर्ष दावा न सांगितल्यास ती रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केली जाते. त्याच वेळी बँका त्यांच्या वेबसाइटवर दावा न केलेल्या ठेवींची यादी जारी करतात. ठेवीदार, लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आरबीआयने एक समर्पित वेब पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here