Home राजकीय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा आणीबाणीचा वादामुळे हे अधिवेशन अधीकच रंगणार आहे

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा आणीबाणीचा वादामुळे हे अधिवेशन अधीकच रंगणार आहे

409
0

शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 9 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनातराज्यपाल रमेश बैस हे अभिभाषण करणार आहेत.सत्ताधारी आणि विरोधी चा वादामुळे अधिवेशन वादळी ठरणार आहे.सत्ता संघर्षावरून विरोधात आणि सत्ताधारी यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्याने हा संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा आणीबाणीचा वादामुळे हे अधिवेशन अधीकच रंगणार आहेत.
विरोधक सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासारख्या अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता बदल झाल्यावर पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here