Home मनोरंजन या अभिनेत्रीने भूमिकेसाठी वाढवले होते चक्क ‘१७ किलो वजन’…!

या अभिनेत्रीने भूमिकेसाठी वाढवले होते चक्क ‘१७ किलो वजन’…!

286
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : नेहमी चर्चेत राहणार्‍या कंगना राणावतने आपल्या आगामी चित्रपट‘थलाईवी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले आहे.हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधाारित आहे. यामध्ये कंगनाने ‘जयललिता’ यांची भूमिका साकारली आहे.विशेष म्हणजे कंगनाने या भूमिकेसाठी १७ किलो वजन वाढविले होते.

‘थलाईवी’चे दिग्दर्शक के. एल. विजय हे कंगनाच्या अभिनयावर फार आनंदी आहेत. ते म्हणाले की, कंगना एक अत्यंत चांगली अभिनेत्री आहे. जयललिता यांच्या भूमिकेतील तिचा अभिनय अत्यंत जबरदस्त आहेत.

‘थलाईवी’ चित्रपटाचे चित्रीकरण संपल्याबद्दल कंगनाने भावनात्मक ट्विट केले आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, आम्ही एका क्रांतिकारी नेत्याच्या जीवनावर आधारित ‘थलाईवी’ चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण केले.असे फारच कमी वेळा होते की, एखाद्या कलाकाराला अशा भूमिका मिळतात की, त्या रक्‍तामध्ये कायमस्वरूपी भिनल्या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here