Home Uncategorized दामिनी पथकाकडून कारवाई….!

दामिनी पथकाकडून कारवाई….!

350
0

मराठवाडा साठी न्यूज
पुणे : रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींचा पाठलाग करणं, त्यांची छेड काढणं अशा अनेक घटना रोज समोर येत असतात. या रोड रोमियोंना पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने चांगलाच धडा शिकवलेला असून आतापर्यंत १२२९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे. दामिनी पथकाच्या कारवाईचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.पुणे पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत भरोसा सेलच्या माध्यमातून पती पत्नी वाद, ज्येष्ठ नागरिक, बाल पथक आणि दामिनी पथक याद्वारे अनेक कामं मागील दोन वर्षांपासून केलं जात आहे. या दरम्यान अनेक घटना समोर आल्या. त्यामध्ये कोणत्याही घटनांचे समुपदेशन करून मार्ग काढण्याचे काम भरोसा सेल करीत आहे. यातून नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे कौटुंबिक किंवा आपल्या जीवनाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्याचं काम केलं जात आहे.विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. “दामिनी पथकाने २०२० मध्ये शहरातील अनेक भागात जनजागृतीपर १९२१ कार्यक्रम घेतले. तर ४०४३ कंट्रोल रूम येथे फोन आले. यादरम्यान छेडछाडीच्या १२१९ घटना घडल्या आहेत. अशा रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. दररोज अनेक भागात गस्त सुरू असते. तेव्हादेखील अनेक घटना समोर येतात आणि सोडवण्याचे काम केलं जात आहे”. तरुणींना कोणत्याही समस्या असल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.त्या पुढे म्हणाल्या की, “महिला सहाय्य कक्षाकडेदेखील असंख्य समस्या घेऊन पती-पत्नी येत असतात. समुपदेशनाच्या माध्यमातून वाद मिटवून, त्या दोघांना पूर्वीसारखे आयुष्य जगण्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी ते आमची १४ जणांची टीम करत असते. तर याच महिला सहाय्य कक्षात २०२० मध्ये पती-पत्नी मधील वादाच्या घटनांबाबत २०७३ अर्ज आले असून ८०७ अर्जांमध्ये तोडगा निघाला आहे. ते एकत्रित राहत असून ८०० अर्ज प्रगती पथावर आहे. त्यात देखील आमच्या टीमला यश मिळेल”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here