Home मराठवाडा बळीराजा अडचणीत ; सोयाबीनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव

बळीराजा अडचणीत ; सोयाबीनवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव

2461
0

मराठवाडा साथी न्यूज / औरंगाबाद
अल्प पर्जन्यमान आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या बळीराजापुढे संकटाची मालिका काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. पिकांवर पडणारी कीड आणि अळी यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आला आहे. सध्या सोयाबीन पिकावर पडलेल्या चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातील अनेक भागात या चक्रीभुंग्याने सोयाबीन पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाने देखील कंबर कसली असून चक्रीभुंग्याला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनच्या कीडग्रस्त फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या याचा आतील कीडसह नायनाट करावा. यापद्धतीच्या 15 दिवसात जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याने अंडी घालू नये याकरिता सुरुवातीपासूनच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसानंतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50%, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस.सी 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6% लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 %झेड.सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशा प्रकारे उपाययोजना कराव्यात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : https://marathwadasathi.com/hsc-aurangabad-division-has-the-lowest-result-in-the-state/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here