Home क्राइम हौसेपोटी केली चक्क इतक्या दुचाकींची चोरी…!

हौसेपोटी केली चक्क इतक्या दुचाकींची चोरी…!

53
0

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : फक्त हौस पूर्ण करण्याकरिता दोन मित्रांनी चक्क १० दुचाकी चोरल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघड झाली आहे. चोरलेल्या सर्व दुचाकींची किंमत जवळपास १० लाख रु.इतकी आहे.विशेष म्हणजे चोरी करणारे दोन्ही मुले अल्पवयीन आहेत.दुचाकी चोरण्यासाठी या मुलांनी बनावट चाव्यांचा वापर केला आहे.दरम्यान,पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरलेल्या मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दोन्ही मुले मोटारसायकल चोरण्यामध्ये तरबेज आहेत.दोघांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते गाड्या चालवण्याचा आनंद घेण्याकरीता गाड्यांची चोरी करीत असत.त्यासाठी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या एका मित्राकडून त्यांनी ही चावी तयार करुन घेतली होती.महत्वाचे म्हणजे चोरी केलेल्या गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ते गाडी तिथेच सोडून द्यायचे आणि काही दिवसांच्या अंतराने दुसऱ्या गाडीची चोरी करायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here