Home राजकीय मंत्री पदाचा राजीनामा …

मंत्री पदाचा राजीनामा …

451
0


मराठवाडा साथी न्यूज
चेन्नई : विधानसभा निवडणुकांपुर्वीच तृणमूल काँग्रेसला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एका मंत्र्याने ममता बॅनर्जी यांना राजीनामा सुपुर्द केला आहे. मंत्री तथा पुर्व क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मी रतन शुक्ला ममता सरकारमध्ये क्रिडा मंत्री होते, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी ते तृणमुल काँग्रेसचे आमदार आहे. लक्ष्मी रतन शुक्ला गेल्या काही दिवसांपासून राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यांनी आज मंत्री पदाबरोबरच हावडा टीमसी जिल्हाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. 2021 या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडणार असून, त्याआधीच टीमसीला गळती लागली आहे. मंत्री पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here