Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन…!

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन…!

666
0

पुणे/सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील ‘रूबी’ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी (२७नोव्हें.) रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची ‘हॅट्ट्रिक’ केली होती.

दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here