Home मनोरंजन लवकरच येतोय “मुंबईकर “

लवकरच येतोय “मुंबईकर “

43
0

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निर्माता-दिग्दर्शक कारण जोहरने चाहत्यांसाठी एक खुशखबरी दिली आहे. ती म्हणजे त्याचा आगामी “मुंबईकर “ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

संतोष सिवान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे पोस्टर साउथचे दिग्दर्शक राजामौली यांनीही पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव लिहले असून यामध्ये चित्रपटातील कलाकार दिसून येत आहेत. कारण जोहरने चित्रपटातील सर्व टीमचे अभिनंदन करत चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे पोस्टमध्ये व्यक्त केले आहे. यामध्ये विक्रांत मैसी ,विजय सेतुपती ,तान्या मानिकलता , संजय मिश्रा ,रणवीर शौरी आणि सचिन खेडेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरवरून चित्रपटात मुंबईचे एक वेगळेच रूप पाहायला मिळणार आहे, असे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here