Home अंबाजोगाई राष्ट्रीय गणित दिनानिमित्ताने शिक्षकांचा गौरव

राष्ट्रीय गणित दिनानिमित्ताने शिक्षकांचा गौरव

558
0

अंबाजोगाई
येथील स्वामी रामानंद तीर्थ आणि बेथुजी गुरूजी प्रतिष्ठाणच्या वतीने राष्ट्रीय गणित दिनाचे निमित्ताने अंबाजोगाई शहर व परिसरात गणित विषय शिकविणारे सेवानिवृत्त शिक्षक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी ज्येष्ठ विधितज्ञ गोविंदराव पांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ मिर महाजेरअली उस्मानी यांची उपस्थिती होती.प्रारंभी थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.प्रा.राम चौधरी यांचे वडील कै.आत्माराम आप्पाराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाजेद खतीब व श्री.देशमुख यांचा गौरव करण्यात आला.तर राष्ट्रीय गणित दिना निमित्ताने सेवानिवृत्त गणित शिक्षक शिवाजीराव देशपांडे,दत्तात्रय रंधवे,गोरोबा पवार,गोरक्षणाथ महाजन,रामकृष्ण पवार,म.वि.कुलकर्णी, पा.यं.दिक्षीत,चौभारकर गुरूजी तसेच प्रा.सुभाष धुळे या मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून यावेळी गौरव करण्यात आला.कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड.गोविंदराव पांडे यांनी अध्यक्षीय समारोप करून प्रमुख पाहुणे अ‍ॅड.मिर महाजेरअली उस्मानी यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम चौधरी यांनी करून उपस्थितांचे आभार अरूण दैठणकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here