Home अर्थकारण आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरणीसह उघडला शेअर बाजार

आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरणीसह उघडला शेअर बाजार

234
0

देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल आज खूपच मंद दिसत आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच ३५० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीमध्येही बाजार उघडताच१७००० च्या खाली व्यवसाय होताना दिसत आहे. बँक निफ्टी ३९३००च्या खाली आला आहे. आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार कोसळला आहे.आजच्या ओपनिंगमध्ये BSE सेन्सेक्स २१७.३८ अंकांच्या म्हणजेच ०.३७ टक्क्यांच्या घसरणीसह ५७,७७३ स्तरावर व्यवहार करत होता. NSE चा निफ्टी ३३.४५अंकांच्या म्हणजेच ०.२० टक्क्यांच्या घसरणीसह १७,०६६ च्या पातळीवर आहे. सेन्सेक्स-निफ्टीची काय स्थिती आहे :आज शेअर बाजाराची स्थिती वाईट दिसत असून सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी फक्त २ शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि २८ शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. निफ्टीमध्ये ५०पैकी फक्त ५ शेअर्स हिरव्या चिन्हात आहेत आणि ४५ शेअर्स लाल चिन्हात आहेत.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढत आहे?
आज सेन्सेक्सचे फक्त २ शेअर्स वर आहेत, ते म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टायटन. घसरलेल्या शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, नेस्ले, एनटीपीसी, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, आयटीसी, एचडीएफसी, सन फार्मा, मारुती, एचसीएल टेक आणि पॉवरग्रिड हे सर्वाधिक घसरले आहेत.
बाजाराच्या घसरणीत आयटी क्षेत्रातील शेअर्सचाही समावेश आहे. निफ्टी आयटी निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरला आहे. निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. यामध्ये इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स टॉप लूसर आहेत, जे १-१ टक्क्यांनी घसरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here