Home आरोग्य चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? तर सावध व्हा

चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? तर सावध व्हा

679
0

सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. परंतु अनेक लोक चहा बनवण्यात आळस करतात, ज्यामुळे एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवून ठेवतात आणि तो प्रत्येक वेळी गरम करून पितात. परंतु वारंवार गरम करूव चहा प्यायल्याने आरोग्याला कोणते गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घ्या… चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल तर या सर्वांसाठी आपल्याला एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा…जणू चहा म्हणजे सर्व आजारांवरच औषधच आहे. त्यातच दुधाच्या चहाची इतकी क्रेझ आहे की, सकाळी उठल्याबरोबर अनेकजण रिकाम्या पोटी चहा घेतात पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन कधीही करू नये. कारण रिकामी पोटी चहा शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यात कहर म्हणजे अनेकजण उरलेला चहा पुन्हा गरम करून पितात.

चहा पुन्हा गरम होणारे नुकसान?

नव्याने चहा बनवण्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेकजण चहा पुन्हा गरम करुन पित असतात. तसेच चहा पुन्हा गरम केल्याने गॅसची बचत होते. पैशांची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते असे विचार करणारे अनेकजण आहेत. पण एका संशोधनात असे निदर्शनात आले की, उरलेला चहा हा गरम करून पियालयाने शारिरीसाठी घातक ठरू शकतात.

१] चव आणि सुगंध कमी होणे
चहा पुन्हा गरम करण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे, चहाचा ताजेपणा आणि चव निघूण जाते. एवढेच नाही तर चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील अनेक पौष्टिक गुणधर्मही दूर होतात.

२] सूक्ष्मजीव वाढ
जर तुम्ही चहा ४ तासांपेक्षा जास्त वेळानंतर पुन्हा गरम करून प्यायचा विचार करत असाल तर तुम्ही ही सवय ताबडतोब बंद करा. कारण उरलेला चहामध्ये बॅक्टेरिया यांसारखे सूक्ष्म जीव वाढवतो आणि तुमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतो.
तसेच, भारतात वापरल्या जाणार्‍या चहाचा प्रकार म्हणजे दुधाचा चहा, ज्यामधून जिवाणूंच्या वाढीचा दर जास्त असतो. जेव्हा हर्बल टीचा विचार केला जातो तेव्हा ते त्यांचे सर्व पोषक आणि खनिजे गमावतात जे जास्त गरम केल्यावर फायदेशीर ठरतात.

३]गंभीर आजार होऊ शकतात
पुन्हा गरम केलेला चहा पिणे खूप धोकादायक असू शकते, कारण जेव्हा आपण चहा पुन्हा गरम करतो तेव्हा सर्व खनिजे आणि चांगले संयुगे बाहेर पडतात आणि त्यामुळे तो पिणे धोकादायक बनते. जर तुम्ही चहा पुन्हा गरम करण्याची सवय सोडली नाही तर तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि पोट खराब होणे, जुलाब, पेटके, गोळा येणे, मळमळ यासारख्या पाचन समस्या पुन्हा उद्भवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here