Home क्रीडा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही देशातील पंतप्रधानांची उपस्थिती

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात दोन्ही देशातील पंतप्रधानांची उपस्थिती

237
0

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना गुरुवारी सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज उपस्थित होते.

मोदी आणि अल्बानीज यांचे स्टेडियममध्ये आगमन झाल्यानंतर क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील ७५ वर्षांच्या मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे पोस्टर झळकावण्यात आले. ज्यावर मोदी आणि अल्बानीज यांचे फोटोही होते.

मोदी आणि अल्बानीज हे स्टेडियममध्ये आले, त्यांचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि राज्याचे गृहमंत्री हर्श संघवी यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह हे देखील उपस्थितीत होते.मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला आणि अल्बानीज यांनी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला कॅप प्रदान केल्या. यानंतर मोदी यांनी लगेचच रोहितचा हात धरला आणि नंतर अल्बानीज यांना थोडे बाजूला करत शुभेच्छा दिल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मध्ये भारतीय सघाकडून रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोह श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव हे खेळनार असून ऑस्ट्रेलिया चे ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा,मार्नस लॅब्युशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, हे खेळाडू असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here