Home बीड उपचार का करत नाही? म्हणून डॉक्टरला मारहाण

उपचार का करत नाही? म्हणून डॉक्टरला मारहाण

डॉ. विवेकानंद ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलिसात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

822
0

मराठवाडा साथी न्यूज

शिरुर कासार: रूग्णालयात उपाचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी संगणमत करुन शहरातील ज्ञानसुधा हॉस्पिटलचे डॉक्टर विवेकानंद ज्ञानोबा ढाकणे यांना मारहाण करत जखमी केले. डॉ. विवेकानंद ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलिसात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील वारणी येथील शिवाजी केदार यांनी बुधवारी दि. 30 विषारी द्रव घेतल्याने सायंकाळी त्यांचे नातेवाईक उपचारार्थ शहरातील ज्ञानसुधा हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. उपचार कामी डॉ.ढाकणे यांनी रुग्णास ‘ तुम्ही काय पिलात, कोणते औषध पिलात, औषधाची बाटली बरोबर आणली का? असे विचारले असता.

सोबत रुग्णाच्या नातेवाईक तुम्ही विलाज करायचा सोडून विचारपूस करता काय? असे म्हणत आरोपी संभाजी शिवाजी केदार, प्रसाद भगवान केदार, सयाजी भीमराव केदार यांनी संगनमत करून डॉ. विवेकानंद ढकाणे यांना शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, डॉ. ढाकणे समजवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी  चापट बुक्क्याने मारहाण करत नाकावर मारून डॉ. ढाकणे यांचे रक्त काढले. या शिवाय अरोपीने त्यांच्या हातावर काठी मारून डावा हात फ्रॅक्चर केला.

हॉस्पिटलमधील औषधी दुकान चालक आंबदास बडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्या तोंडावर फाईट मारून मुकामार दिल्याच्या डॉ. विवेकानंद ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी संभाजी शिवाजी केदार, प्रसाद भगवान केदार, सयाजी भीमराव केदार यांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात भा.द.वी.कलम 324, 325, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here