Home मुंबई सभागृहात मंत्री उपस्थित नाहीत, आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला? अजितदादांचा संताप

सभागृहात मंत्री उपस्थित नाहीत, आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला? अजितदादांचा संताप

307
0

मुंबई: आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात, अशी तक्रार करत विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत संतापले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावत अध्यक्षांनी कडक शब्दात समज द्यावी, अशी मागणी केली.
सरकारमधील मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे. या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत सरकारने याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला दिली.राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच आपल्या मतदार संघातील प्रश्न विविध संसदीय आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच सरकारकडून याबाबत उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र सरकार मधील मंत्री याबाबत गंभीर नसतात. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते. सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

तातडीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा : अजित पवार
वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे. दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here