Home अहमदनगर सोनू सूदचा दिलदारपणा ,१०० मुलांना “Smart Phones “चे केले वाटप.

सोनू सूदचा दिलदारपणा ,१०० मुलांना “Smart Phones “चे केले वाटप.

573
0

अहमदनगर : अभिनेता सोनू सूदचा दिलदारपणा आपण पहिलाच आहे. पण आता त्याने परत असे काही केले ज्यामुळे तो परत एकदा “नायक “ठरला आहे. सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यात सरकारने ऑनलाईन शिक्षणाचे धोरण स्वीकारले आहे. पण भारतातील असे काही विद्यार्थी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यात काही मजूर कुटुंबही आहेत. ज्यांना स्मार्ट फोन परवडणारा सोनू सूदने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहावे यासाठी कोपरगाव येथील १०० विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन चे वाटप केले आहे.

कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयच्या विद्यार्थ्यांना तब्बल १० हजार रुपयांचे १०० स्मार्ट फोनचे वाटप त्याने केले आहे.सोनूचा मित्र विनोद रक्षेला हा कोपरगाव येथे राहतो . त्याने या विद्यार्थ्यांची अडचण सोनूला सांगितली आणि ती ऐकताच सोनू त्यांच्यासाठी धावून आला. त्याने थेट कोपरगाव गाठून त्याच्या हाताने या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनचे वाटप केले. त्यामुळे अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा “नायक ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here