Home jobs पारंपरिक कलेच्या माध्यमातून शेकडो गुजराती महिलांना रोजगार

पारंपरिक कलेच्या माध्यमातून शेकडो गुजराती महिलांना रोजगार

276
0

मुंबई : आपल्या देशाला हस्तकलेची मोठी परंपरा आहे. वेगवेगळ्या राज्यात या कलेचा प्रसार झाला. विशेष म्हणजे आजही यापैकी काही कला टिकून आहेत. गुजरात राज्यातील भावनगरमध्ये विविध आकारांच्या रंगीत मण्यांचा वापर करुन एक कला जोपसण्यात आली आहे. काठेवाडी संस्कृतीचा भाग असलेल्या या कलेला सुशोमन किंवा बीडवर्क असं म्हंटलं जातं. नवी मुंबईतसुरू असलेल्या प्रदर्शनात याबाबतचा एक खास स्टॉल लावण्यात आला आहे. काय आहे ही कला पाहूया.

भावनगर जिल्ह्यातील अमरगड गावातील महिलांनी आजही ही परंपरा जपून ठेवली आहे. या गावातील प्रत्येक महिलेला ही कला लहानपणापासून येते. यामध्ये रंगीबेरंगी लहान मण्यांचा वापर करून विविध प्रकारच्या वस्तू साकारल्या जातात. बारीक नक्षीकाम करून पारंपारिक तोरण, पूजेला लागणाऱ्या वस्तू, श्रीकृष्णाचा पाळणा, चौरंग, दागिने, किचन, हंडा अशा विविध वस्तू तयार केल्या जातात.

या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार पारूल दवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ल्या 28 वर्षांपासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आम्ही गावातील महिला मिळून बीड वरच्या माध्यमातून अनेक आकर्षक वस्तू तयार करतो. दागिने, रुखवतामध्ये लागणाऱ्या वस्तू, तोरण, बाळ कृष्णाचा पाळणा या प्रमुख वस्तू आम्ही तयार करतो. आमच्या सोबत जवळपास पाचशे महिला काम करत आहेत. या महिलांना आम्ही बीडवरच्या माध्यमातून रोजगार देतो. या कामातून प्रत्येक महिला महिन्यासाठी दोन ते तीन हजाराचे उत्पन्न मिळवते. बीडवर्कच्या माध्यमातून आम्ही दीडशेपेक्षा जास्त वस्तू तयार करतो. या वस्तूंची किंमत 50 रुपयापासून ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.

‘मी संस्थेच्या माध्यमातून बीडवरचं प्रशिक्षण देखील घेतलं आणि त्यानंतर आता मी अनेक प्रदर्शनामध्ये देखील सहभाग घेते. सर्वात जास्त लोकांना दागिने, तोरण, आणि ट्रेडिंग वस्तू या कलेमध्ये बनवलेला आवडतांना पाहायला मिळतात. काही वस्तू या एका दिवसात तयार होतात तर काही वस्तूंना साधारणतः दोन ते तीन महिने सुद्धा लागतात. संस्कृतिक आणि पारंपारिक अशाच वस्तू आम्ही तयार करतो आणि त्याच वस्तूंना सर्वात जास्त मागणी आहे,’ अशी माहिती आणखी एक कलाकार हिरलबा गोहील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here