Home क्राइम नणंदेचे अनैतिक संबंध उघड केल्याने सासरच्यांनी केला सुनेचा छळ

नणंदेचे अनैतिक संबंध उघड केल्याने सासरच्यांनी केला सुनेचा छळ

426
0

नांदेड:नणंदेचे अनैतिक संबंध असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर सासरच्यांनी सुनेचा छळ करण्यास सुरु केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील चक्रधरस्वामी नगर भागात ही घटना घडली. या बाबत शनिवारी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला कविता (बदललेले नाव) हिचा विवाह 24 जून 2018 रोजी चक्रधरस्वामी नगर येथील किशोर मनोहर गोवंदे यांच्याशी झाला होता. लग्नामध्ये वर पक्षाला सर्वच मानपान देण्यात आले होते. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी तक्रारदार कविताला चांगले नांदवले. पण एकेदिवशी पीडितेने आपल्या नणंदेचे परपुरुषासोबत असणारे अनैतिक संबंध पाहिले. ती गोष्ट तिने आपल्या नवऱ्यासह सासू व सासऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हापासून या सर्वांनी तिचा छळ सुरू केला.दरम्यानच्या काळात पीडितेला एक मुलगी झाली. त्यानंतर तिला पुन्हा दिवस गेले. पण तिचा छळ संपला नाही. 31 मे 2020 रोजी पुन्हा सासूने आता मुलाला जन्म दिलास, तर मी मरून जाईल असे सांगत तिला मारहाण केली. तसेच एका मांत्रिकाकडून आणलेले औषधही तिला बळजबरीने पाजण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट पीडित तक्रारदार महिलेने आपल्या आई-वडिलांना सांगितली असता त्यांनी सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी राहू लागली. ती आजही तिथेच राहते. पीडित पक्षाने सासरच्या मंडळींची वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाचीही मदत घेतली. पण काहीच फायदा झाला नाही. अखेर शनिवारी म्हणजे 18 मार्च रोजी त्यांनी यासंबंधी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी यासंबंधी कविताचा नवरा किशोर मनोहर गोवंदे, सासरा मनोहर पुरभाजी गोवंदे यांच्यासह सासू, नणंद, सासूची बहीण आदींविरोधात भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीचा पुढील तपास पोहेकॉ मोरताडे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here