Home क्राइम मुलानेच चोरली गाडी….. !

मुलानेच चोरली गाडी….. !

41
0

मराठवाडा साथी
औरंगाबाद : औरंगाबादमधील राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी चक्क मुलानेच लांबविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून पोलिसांनी दुचाकीचोर मुलाला अटक केली. सौरभ प्रवीण मुंडे (२३, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) असे त्याचे नाव आहे. प्रवीण निवृत्ती मुंडे (५०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) यांची दुचाकी २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी १ जानेवारी रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या या घटनेचा शोध सुरू असताना मुंडे यांचा मुलगा सौरभकडे दुचाकीबाबत विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सौरभने तोंड उघडत चोरलेली दुचाकी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. आरोपीला अटक केली आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुरेश जिरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त मीना मकवाना, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, पवन इंगळे, नजीर पठाण, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, सुनील बेलकर, प्रभात म्हस्के, विजय पिंपळे, रवी खरात, नितीन धुळे, नितीन देशमुख व संदीप बिडकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here