Home क्राइम अमृता फडणवीस याना लाच देणाऱ्या आरोपीला अखेर गुजरातमध्ये अटक,

अमृता फडणवीस याना लाच देणाऱ्या आरोपीला अखेर गुजरातमध्ये अटक,

285
0

मुंबई : अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे.अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तिच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. तर अनिल जयसिंघानी हा फरार होता. अखेर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरणअनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. २०१६ -१७ ला तिची ओळख अमृता फडणवीस यांच्याशी झाली होती. त्यानंतर पुन्हा अनिक्षा २०२१ मध्ये अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. तिने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्या वडिलांना एका चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. त्यांना सोडवण्यासाठी मदत करावी अशी मागणी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे केली. मात्र अमृता फडणवीस यांनी त्याला नकार दिल्यानंतर तिने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फडणवीस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिक्षा जयसिंघानीला अटक केली. त्यानंतर आता तिच्या वडिलांना म्हणजे अनिल जयसिंघानी याला देखील गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here