Home मनोरंजन रणरागिणी ताराराणींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

रणरागिणी ताराराणींच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

293
0

मुंबई: मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसध्या विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ‘व्हिक्टोरिया’ च्या माध्यमातून भेटीला आली होती. तर आता अभिनेत्री आपल्या बहुचर्चित रणरागिणी ताराराणींच्या रुपात भेटीला येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता होती.दरम्यान आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर भेटीला आला आहे. या टिझरला प्रचंड पसंती मिळत आहे.स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली, बिकट आणि अवघड परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक लेक, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.नुकतच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचं संगीत लाभलं आहे.टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसते. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाज जागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे म्हणूनच प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत.”छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ” छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे.अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.

https://www.instagram.com/reel/CpWoqjFI9en/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here