Home पुणे गृहमंत्र्यांनी दिला पुणेकरांना ‘सुखद धक्का’…!

गृहमंत्र्यांनी दिला पुणेकरांना ‘सुखद धक्का’…!

441
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना आनंदाचा धक्का दिला आहे.आज पहाटे पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी देशमुख यांनी हजेरी लावली त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन “हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असे म्हणत त्यांनी पुणेकरांच्या तक्रारी लिहून घेतल्या आणि त्या तक्रारी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचविल्या.दरम्यान,यावेळी त्यांनी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केले.

या संदर्भात माध्यमांशी बोलतांना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की,आमचे पोलीस या दहा महिन्यात दिवस रात्र काम करुन थकला आहे,मात्र हिंमत हरलेला नाही.आजही त्याच हिंमतने सणवार,उत्सव,मोर्चे,आंदोलनात पोलीस दिवसरात्र रस्त्यावर राहून काम करत आहेत.३१ डिसेंबरला नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करतात पण त्यावेळी पोलीस रस्त्यावर उभे राहून कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काम करतात.त्यामुळे मी आज नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आलो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here