Home महाराष्ट्र आ देखे जरा किसमे कितना हे दम……. !

आ देखे जरा किसमे कितना हे दम……. !

454
0

ईडीची नोटीस अन राऊतांची ट्विटरवर चॅलेंज

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसनुसार 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. यावर महाविकास आघाडीकडून केंद्र सरकारचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. “ईडीची नोटीस आल्याचे भाजपचे नेतेच सांगत आहेत. कदाचित त्यांच्याकडे जास्त माहिती असेल . म्हणून मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे, ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल” असा टोला लगावत संजय राऊत यांनी भाजपाला निशाण्यावर धरले आहे.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर “आ देखे जरा किसमे कितना हे दम ,जमके रखना कदम मेरे साथिया “या गाण्याच्या ओळी ट्विट करत एकप्रकारे भाजपाला अप्रत्यक्ष चॅलेंजच दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here