Home अहमदनगर एकलव्य संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे केली तक्रार

एकलव्य संघटनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे केली तक्रार

33878
0

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतींनी २६ जानेवारी रोजी घेतलेल्या ग्रामसभेत प्रसिद्ध केलेल्या घरकुल “ड” यादी मध्ये अनुसूचित जमाती चे भिल्ल समाजातील बहुतांशी पात्र लाभार्थी लोकांना अपात्र दाखवून त्यांना घरकुल लाभापासून वंचित ठेवल्या बाबत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य चे कोपरगाव तालुका युवा अध्यक्ष उत्तम पवार यांनी एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत कोपरगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार दाखल केली आहे.
२६ जानेवारी २०२२ रोजी कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्राम स्तरीय समितीने जे सर्वेक्षण केलेले आहे ते चुकीच्या पद्धतीने झाले असून त्यामध्ये वस्तुस्थितीची पाहणी न करताच पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे त्यामुळे अनेक अनुसूचित जमातीचे भिल्ल समाजाचे नागरिक यामध्ये घरकुल लाभापासून वंचित राहणार आहेत म्हणून याचे फेर सर्वेक्षण करावे अशा मागणीचा अर्ज एकलव्य संघटनेतर्फे युवा तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांनी आदिवासी कार्यकर्त्यांसमवेत कोपरगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिला.
ते पुढे म्हणाले की येत्या महिनाभरात या सर्व घरकुल याद्यांचे फेर सर्वेक्षण करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हाडा सभापती (राज्य मंत्री दर्जा) तसेच किरण ठाकरे राज्य महासचिव, अशोक माळी राज्य संघटक व गोरख नाईक, जिल्हाध्यक्ष अहमदनगर उत्तर यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी व पंचायत समिती मध्ये संतोष नलगे कार्यालयीन अधीक्षक यांनी अर्ज स्वीकारला या अर्जावर एकलव्य संघटना कोपरगाव तालुका अध्यक्ष रोहीदास गोधडे, महेश माळी, शंकर बर्डे, रमेश माळी, सुनील ठाकर, भाऊसाहेब जाधव, किरण अहिरे, शिवाजी सोनवणे, महेंद्र बर्डे आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here