Home आरोग्य उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने नक्की...

उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने नक्की होईल फायदा

427
0

चेहरा साफ करण्यासाठी बरेचसे लोक क्लिंझरचा वापर करत असतात. महिलांप्रमाणे पुरुषदेखील आता स्क्रीन केअरबाबत जागरुक झाले आहेत. बहुंताश जण चेहरा धुण्याकरिता क्लिंझर वापरत असल्याचे पाहायला मिळते. वाढते प्रदूषण, बांधकामांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण, उन्हाचा तीव्र प्रभाव अशा काही गोष्टींमुळे चेहऱ्यावर नकारात्मक परिणाम होऊन त्वचा निस्तेज होण्याचा धोता असतो. अशा वेळी चेहरा स्वच्छ धुतल्याने त्वचेला फायदा होतो असे तज्ज्ञ सांगतात.

चेहऱ्याची त्वचा ही खूप संवेदनशील आणि नाजूक असते. त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा लगेच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्याची निगा राखणे आवश्यक असते. प्रामुख्याने या स्कीन केअरसाठी लोक पाण्याने चेहरा साफ करत असतात. पण या गोष्टीमध्येही अनेकजण चुका करत असतात. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी चेहरा धुताना आपण करत असलेल्या काही सामान्य चुकाबाबतची माहिती सांगितली आहे.

चेहरा स्वच्छ करताना नकळत होणाऱ्या चुका
१. अस्वच्छ हातांना चेहरा साफ करणे.
२. मेकअप न काढणे.
३. चुकीच्या क्लिंझरचा वापर करणे.
४. अतिगरम किंवा अतिगार पाण्याने चेहरा धुणे.
५. चेहरा ६० सेकंदापेक्षा कमी कालावधीमध्ये धुणे.
६. क्लिंझरचा अतिवापर करणे.
७. चेहरा जोरजोरात घासणे.
८. वॉशक्लोथ किंवा वाइप वापरणे
९. त्वचा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात एक्सफोलिएट करणे.
१०. क्लिंझिंग करणे टाळणे.
११. क्लिंझिंग केल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर न करणे.
१२. दिवसातून एकदाच चेहरा धुणे.
१३. चेहरा साफ करताना कान, नाक, मानेचा भाग स्वच्छ न करणे.

दिवसातून दोन वेळा म्हणजेच सकाळी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा तोंड स्वच्छ धुतल्याने चेहऱ्यावरील त्वचा निरोगी राहते असे म्हटले जाते. झोपताना चेहऱ्यावरील सूक्ष्म ग्रंथीमधून तेल, घाम बाहेर आलेले असतात, ते काढून टाकण्यासाठी सकाळी चेहरा धुवावा. रात्री झोपण्याआधी मेकअप काढून मग चेहरा स्वच्छ करावा असे तज्ज्ञ सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here