Home अर्थकारण शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात तेजी

104
0

९८ अंकांच्या वाढीसह ५७,७५१ वर उघडला, निफ्टीही ४६ अंकांनी वधारला

भारतीय शेअर मार्केटमध्ये आज म्हणजेच २८ मार्च सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून येत आहे. सेन्सेक्स ९८ अंकांच्या वाढीसह ५७,७५१ च्या पातळीवर उघडला. त्याचवेळी निफ्टीतही ४६ अंकांची वाढ झाली आहे, तो १७,०३१ स्तरावर उघडला. सुरूवातीच्या व्यापारात सेन्सेक्सच्या ३० पैकी २४ समभागांमध्ये वाढ आणि ६ मध्ये घट झाली.आज अदानी समूहाच्या १० पैकी ८ शेअर्समध्ये घसरण होत आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सकाळी ९.३० वाजता ०.९१% घसरत होते. त्याच वेळी, अदानी ट्रान्समिशन, टोटल गॅस आणि ग्रीन एनर्जीमध्ये 5-5% ची घसरण होत आहे.
जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळत आहेत. बँक आणि एनर्जी शेअर्समुळे काल अमेरिकन बाजारांनी तेजी दाखवली. डाऊ जोन्स जवळपास २०० अंकांनी वर आहे पण नॅस्डॅक अर्धा टक्का खाली आहे. आशियाई बाजारांमध्ये वाढीचे वातावरण आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) विक्री अव्याहतपणे सुरू आहे. सोमवारी एफआयआयने रोख बाजारात ८९१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) काल१८०९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. एफआयआयने मार्च महिन्यात आतापर्यंत एकूण १,१३७ कोटी रुपयांची विक्री केली आहे. तर, DII ने या महिन्यात आतापर्यंत एकूण २७,४०२ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
सोमवारी म्हणजेच २७ मार्च रोजी बाजारात वाढ झाली होती. सेन्सेक्स १२६अंकांच्या वाढीसह ५७,६५३ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टीतही ४० अंकांची वाढ झाली. १६,९८५वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १६ वधारले आणि १४ घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here