Home आरोग्य मासिक पाळीच्या रक्ताची जादूटोण्यासाठी विक्री:सासरच्यांवर गुन्हा दाखल,प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कारवाई करा- रुपाली...

मासिक पाळीच्या रक्ताची जादूटोण्यासाठी विक्री:सासरच्यांवर गुन्हा दाखल,प्रकरणातील आरोपीवर तात्काळ कारवाई करा- रुपाली चाकणकर

421
0

पुणे:पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटाेण्यासाठी ५० हजाराला विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार अतिशय घृणास्पद असून विकृत मानसिकता असणाऱ्या या आराेपींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. याप्रकरणाची राज्य महिला आयाेगाने दखल घेतल्याची माहिती राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयाेग या केसच्या संबंधितांना निर्देश देईलच परंतु पुण्यासारख्या शहरात अजूनही अंधश्रध्देला बळी पडणारी कुटुंबे आहे ही दुर्देवी बाब आहे. दाेनच दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन साजरा करत आपण सर्वांनीच स्त्री शक्तीचा सन्मान केला. परंतु आज घृणास्पद घटनेत महिलेवर झालेला अत्याचार पाहून अजून किती आणि कसा लढा बाकी आहे असा प्रश्न पडताे. पुणे हे विद्येचे माहेरघर असून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या घटना चुकीच्या आहे. अशाप्रकारच्या घटना पाहता महिलां बाबत अत्याचाराच्या घटना कितपत रुजलेल्या दिसून येते.असे प्रकार राेखण्यासाठी राज्य महिला आयाेग जागरुकता कार्यक्रम सातत्याने राबवत आहे.काैटुंबिक वादातून २७ वर्षीय पत्नी साेबत अघाेरी कृत्य करुन तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह सात जणांवर विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाेलीसांनी आराेपींच्या विरुध्द अनैसर्गिक कृत्य, विनयभंग व शारिरिक व मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघाेरी प्रथा जादुटाेणा प्रतिबंध अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. विवाहनंतर पिडित महिला बीड जिल्हयातील एका गावात पतीच्या घरी राहत हाेती. त्यावेळी मासिक पाळी दरम्यान कापसाने तिचे रक्त काढून जादुटाेणा करिता त्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here